Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्या प्रकरणात शिवसेनेची महत्वाची भूमिका-राऊत

मुंबई प्रतिनिधी । अयोध्या प्रकरणी शिवसेनेची भूमिका सर्वात महत्वाची ठरल्याचे प्रतिपादन आज खासदार संजय राऊत यांनी केले. या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनी स्वागत करण्याचे आवाहनदेखील केले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, जेव्हा बाबरी मशिदीचे पतन झाले तेव्हा भल्याभल्यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत अंग झटकले होते. तेव्हा संपूर्ण भारतात बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे याबाबत आपल्या शिवसैनिकांचे कौतुक केले होते. तर अलीकडच्या काळात हे प्रकरण थंड बस्त्यात गेले असतांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला भेट दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या पार्श्‍वभूमिवर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आम्ही सर्व वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याला मान्य राहणार असल्याचे प्रतिपादनदेखील संजय राऊत यांनी केले.

Exit mobile version