Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिओ लसऐवजी सॅनिटायझर पाजले; 12 बालकांची प्रकृती खालावली

यवतमाळ- पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12 बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी सॅनिटाझर पाजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे 12 मुलांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत.

घडलेल्या सर्व प्रकरणानंतर मंत्री बच्चू कडू यांनी संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, असल्याची माहिती दिली आहे. बच्चू कडू ट्विट करत म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील कापसी कोपरी या आरोग्य केंद्रावर पोलीओऐवजी सॅनिटायझर पाजण्याचा प्रकार घडला. या हलगर्जीपणा मुळे 12 लहान बाळांचे जिव धोक्यात आले.

स्थानीक प्रशासनास संपर्क करुन संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

 

Exit mobile version