Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रजासत्ताक दिनानिमित्त राधाराणी बचत गटाकडून स्वच्छता अभियान

फैजपूर प्रतिनिधी । येथील राधाराणी बचत गटाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरात स्वच्छता अभियानाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

या बचत गटाने फैजपूर शहरातील बस स्टँड परिसर, नगरपालिकेचा दवाखाना, नगरपालिका परिसर झाडून स्वच्छ केला. यात घन कचरा, प्लास्टिक पिशव्या आदीं जमा करून एकत्र केला. या अभियानात राधाराणी बचत गटातील मुख्य सौ. विद्या सरोदे, गटाच्या अध्यक्ष सौ. अनुराधा बाई परदेशी, उपाध्यक्षा सौ. अश्विनी परदेशी, श्रीमती अनिता परदेशी, सौ. पद्मा परदेशी, सुमित्रा परदेशी, ज्योती परदेशी, सरीता परदेशी, श्रीमती संगीता चौधरी, सपना साळी, आदी महिला सहभागी झाल्या. राधा राणी बचत गटा तर्फे शहरात नेहमीच वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबविले जातात. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version