Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या सानियाचा बुध्दीबळ स्पर्धेत डंका : पटकावले विजेतेपद !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत जळगावच्या सानिया तडवी हिने विजेतेपद पटकावले.

क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनतर्फे फिडे नामांकित महिलांची राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडली. या स्पर्धेत जळगाव येथील कु. सानिया रफिक तडवी हिन ८ पैकी ७ गुण (६ विजय २ ड्रॉ) मिळवून स्पर्धेत अपराजित राहत प्रथम क्रमांक मिळविला.

सानिया हिला चषक व १५ हजार रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून मदर अली, प्रशांत विघ्नेश्वर, संग्राम शिंदे, आश्विन मुसळे, मुख्य ऑर्बिटर सप्नील बनसोड, ऑर्बिटर कुमारी गायत्री पाणबुडे, कुमार कनकम, नरेंद्र कन्नाके उपस्थित होते.

दरम्यान, या कामगिरीमुळे गुजरात येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सानिया तडवी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तिने स्पर्धेत कोल्हापूर ची दिव्या पाटील, आदिती कायल पुणे, ह्यांना हरवून श्रुती काळे औरंगाबाद, तसेच दिशा पाटील कोल्हापूर ह्याच्याशी बरोबरीत डाव साधत महाराष्ट्रात यश मिळवून विजय मिळवला. दि.१६ ते १८ जून दरम्यान तीन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रातूून ४४ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा ८ राऊंड मध्ये घेण्यात आली. सानिया ही महिला बाल कल्याण विभागाचे उपजिल्हाधिकारी रफिक तडवी यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी कौतूक केले आहे.

Exit mobile version