Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘सांगवी बु.’ येथील नागरिकांचा ‘मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी अभियाना’स प्रतिसाद

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील ‘सांगवी बु.’ येथील नागरिकांचा ‘मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी अभियाना’च्या सहाव्या सत्रास चांगला प्रतिसाद लाभला.

बुधवार, दि.०९ फेंब्रुवारी रोजी यावल तालुक्यातील सांगवी बु येथे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा यावल नगर परिषदचे तत्कालीन नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांशी विविध योजनांचा लाभ मिळावा याकरीता भविष्यात उपयुक्त ‘ई-श्रम कार्ड’ची मोफत नोंदणी अभियान सहाव्या सत्रात पोहोचले आहे. ‘सांगवी बु.’ गावातील ग्रामपंचायतजवळ ‘मोफत ई -श्रम कार्ड’ नोंदणीचे सत्र घेण्यात आले,

गावातील एकूण ३८५ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. अभियानाचे उदघाट्न जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक नारायण चौधरी, यावल पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, डॉ.कुंदन फेगडे, सरपंच रशीद तडवी, धनराज पाटील, दिनेश पाटील, योगेश भंगाळे, शरद तायडे, प्रशांत बेंडाळे, अभय नेमाडे, प्रशांत चौधरी, अतुल चौधरी, राजू तडवी, न्याजउद्दिन तडवी, फिरोज तडवी, कुंदन कोळी, युवराज कोळी, योगेश कुंभार, प्रकाश कोळी, भूषण सूर्यवंशी, सुनील बाणाईत, जितेंद्र कोळी, पवन कोळी, रवींद्र कोळी, योगेश धांडे, मिलन पाटील, सचिन कोळी आदींची उपस्थिती होती.
या अभियानास धिरज भोळे, सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, दिपक फेगडे, हर्षवर्धन मोरे, जयवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

 

Exit mobile version