Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सानेगुरुजी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी भरती नियमबाह्य

given

यावल प्रतिनिधी । शहरातील साने गुरूजी विद्यालयात 9 मार्च 2019 रोजी तीन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती अनधिकृत असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी जि.प.शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे या भरतीला शासकीय मान्यता देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील साने गुरूजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 9 मार्च 2019 रोजी तीन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही भरती अनधिकृत असल्याची तक्रार यावल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जि.प.शिक्षणाधिकारी यांच्याकडे 26 मार्च आणि 5 एप्रिल 2019 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांनी 27 मे 2019 चौकशीचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला.

कारवाई करण्याची केली होती मागणी
माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील आणि नगरसेवक राकेश कोलते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार यावल नगरपरिषद व्दारे संचलीत साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी अनाधिकृत भरतीला शालय समितीचे अध्यक्ष आणी सचिव हे देखील जबाबदार असुन यांच्यावर कायद्याशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती अशी माहीती अतुल पाटील यांनी प्रातिनिधीशी बोलतांना दिली.

Exit mobile version