Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खिरोद्यातील अध्यापक विद्यालयात साने गुरूजी जयंती साजरी

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात साने गुरूजी जयंती साजरी करण्यात आली.

अध्यापक विद्यालय खिरोदा येथे साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ .सौ.प्रतिभा बोरोले या होत्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की सानेगुरुजी  आपले जीवन साधेपणाने जगले.आपल्या आईचा प्रत्येक शब्द गुरुजी पाळत असत संपुर्ण जीवनभर त्यांनी सत्याची कास सोडली नाही , गुरुजी तुरुंगात गेल्यावर सुद्धा त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सोडले नाही.

या प्रसंगी विद्यालयात साने गुरुजींनी तुरुंगात लिहलेल्या बेचाळीस रात्रीवर आधारीत विविध नाटीका सादर करण्यात आल्या. साने गुरुजींनी लिहिलेल्या विविध प्रार्थना, भावगीतांच्या स्पर्धा घेण्यात  आल्या . यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तविक सौ हेमांगी  चौधरी यांनी केले . सुत्रसंचालन कु हर्षाली महाजन यांनी केले . आभार कु.रिया वाघ यांनी केले. यावेळी छात्रध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version