बीएसएफ जवान संदीप नारखेडे यांचा सावद्यात सन्मान

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । फेब्रुवारी महिन्यात भारतात घुसखोरी करणाऱ्या तीन परदेशी घुसखोरांना ठार केल्याबद्दल बीएसएफ जवान संदीप नारखेडे यांचा सावद्यात सन्मान करण्यात आला आहे.

जवान संदीप नारखेडे यांच्या या शूर कार्याबद्दल भारत सरकारने रोख रक्कम ५० हजार रु. बक्षीस  आणि विशेष मेडल दिले आहे. सीमेवरील कारवाई नंतर नारखेडे हे प्रथमच सावदा गावी आले असता त्यांचा ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे मोदी केअर सेंटर आणि पोलिस ठाणे येथे पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड, स्वामी नारायण गुरुकुल येथे शास्त्री भक्ती किशोरदास यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नारखेडे यांनी यावेळी आपले अनुभव सांगत देशासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी असते, असेही सांगितले.

भारतीय सीमेवर अहो रात्र पहारा देऊन सीमा सुरक्षा करणारे जवान यांच्या बद्दल अभिमानच आहे. भारतीय सैनिक मुळेच देश सुरक्षित आहे. येथील रहिवासी सीमा सुरक्षा दलाचे जवान संदीप नारखेडे यांनी फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीर संभा सेक्टर मधे घुसखोरांना कंठ स्नान करून शुर अशी कारवाई केली होती.याचा देश वासियांना आणि शहर वासियांना अभिमानच आहे.पोलिस पेक्षाही सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांची जबाबदारी आणि जोखीम खूप मोठी असते.असे विचार पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांनी व्यक्त केले. सहायक पोलिस निरीक्षक डी.डी इंगोले यांनी पण नारखेडे यांचे कौतुक केले.

संदीप नारखेडे हे आज पुन्हा आपल्या कर्तव्य बजावण्यासाठी जम्मू काश्मीर कडे रवाना झाला.त्यांच्या पुढील कर्तव्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार शामकांत पाटील, प्रवीण पाटील, जितेंद्र कुलकर्णी, मिलिंद टोके, दीपक भगत आदी उपस्थित होते.

 

Protected Content