Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समुद्रात पुन्हा ढकलण्यात आले ‘व्हेल मासे’

georgia whales

मुंबई प्रतिनिधी । आपण अलिकडे अनेकदा बघतो की, लोक सेल्फीच्या नादात माणुसकी विसरून इतरांना मदत करायचे विसरून जातात. मात्र इथे तसं नसू सर्वांनीच व्हेल माशांना पुन्हा समुद्रात ढकलण्यासाठी हातभार लावण्यात आला आहे.

अमेरिकेतील जॉर्जियामधील एक फारच कौतुकास्पद अशा घटनेची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. येथील East beach St. Simons Island वर माणुसकीचं एक उत्तम उदाहरण बघायला मिळालं. हे मासे व्हेल माशांची एक प्रजाती आहेत. त्यांना Pilot Whales असं म्हटलं जातं. या माशांचा मनुष्यांना कोणताही धोका नसतो. परंतु येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासे मृत्युमुखी पडत असल्याचे लक्षात येताच, लोकांनी पुढाकार घेऊन त्यांची मदत केली. अर्थातच अनेकांना प्रश्न पडला असेल की, असं झालं कसं? इतके व्हेस मासे अचानक समुद्र किनाऱ्यावर येऊन का मरण पावत आहेत? याबाबत Georgia Department of Natural Resources चे बायोलॉजिस्ट क्ले जॉर्ज यांनी सांगितले की, ‘अनेकदा असं होतं की, मासे दुसऱ्या माशांचा पाठलाग करत किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर पाणी कमी असतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो’.

Exit mobile version