Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्हिएतनाम मधील प्रकल्प सॅमसंग भारतात आणणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जगभरातील स्मार्टफोन निर्मात्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवल्याचे चित्र सध्या आहे. मूळची दक्षिण कोरियामधील सॅमसंग ही स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून त्यांनी परदेशातील उद्योग भारतामध्ये हलवण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे.

त्यांच्या सध्याच्या व्हिएतनाममधील स्मार्टफोन निर्मितीचा मोठा हिस्सा भारताबरोबरच अन्य काही देशांमध्ये स्थलांतरित करणार आहेत. सॅमसंग भारतामध्ये ४० बिलीयन डॉलर्सचे म्हणजेच ३ लाख कोटींचे स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी युनिट सुरु करण्यासंदर्भातील हलचाली करत आहे.

या व्यवहाराशी संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “सॅमसंग कंपनी भारतामध्ये स्मार्टफोन निर्मितीसाठी पीएलआय म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टीव्ह योजनेअंतर्गत काम करणार आहे. यामुळे सध्या व्हिएतनाबरोबरच इतर देशांमध्ये सुरु असणारा निर्मिती उद्योग कंपनी भारतामध्येच करण्याची दाट शक्यत आहे.”

सध्या जगभरामध्ये सर्वाधिक स्मार्टफोन निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चीन खालोखास व्हिएतनामचा क्रमांक लागतो. भारतामध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या कारखान्याच्या माध्यमातून प्रामुख्याने २०० डॉलरपर्यंत किंमत असणाऱ्या स्मार्टफोनची निर्मिती केली जाईल.

४० बिलीयन डॉलर्सपैकी २५ बिलीयन डॉलर्सचा वाटा हा २०० डॉलर किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा असेल. सर्वच फोन हे भारताबाहेर निर्यात केले जातील.

Samsung Smartphones, Smartphones, Morcha to India, South Korea, Samsung Company, PLI, Production Linked Incentives,

 

Exit mobile version