Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजी ब्रिगेड पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शिवाजी नगर, पुणे येथे नुकतीच संभाजी ब्रिगेड राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीयध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.

यासह तुषार भगवान सावंत यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष पदी व संदीप पितांबर पाटील यांची जळगाव शहर महानगरध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष सुधीर भोसले , कोषाध्यक्ष अमोल काटे , महासचिव सुभाष बोरकर, उपाध्यक्ष छगन शेरे व सोमेश्वर आहेर, सचिव आत्माराम शिंदे, संघटक प्रदीप कणसे, पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह खास, पुणे महानगरध्यक्ष हर्षवर्धन मगदूम हे उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना जास्तीत जास्त मराठा – बहुजन समाजाच्या तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळून देश – विदेशात जाऊन आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी. असे आवाहन करत येणाऱ्या काळात “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा”  या संकल्पेच्या माध्यमातून २० लाख तरुणांना विदेशात स्थैर्य मिळवून देण्याचा मानस प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी सांगितला.

Exit mobile version