Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘सांबरी’ प्रथम

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून विद्या फांऊडेशन, जळगाव या संस्थेच्या ‘सांबरी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ या संस्थेच्या गुणांच्या सावल्या या नाटकास द्वितीय पारितोषिक पारितोषिक प्राप्त झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. दरम्यान, दि.२२ मार्च व २३ मार्च, २०२२ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक उषा चोरघडे (नाटक- बंद पुस्तक), द्वितीय पारितोषिक अजय पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पियुषा महाजन (नाटक- नाते तुझे नी माझे) व रुपेश पाटील (नाटक-भूत), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रवीण गुरव (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक अमोल ठाकूर (नाटक-सहल), नेपथ्य : प्रथम पारितोषिक विकास बाटुंगे (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक मोहिनी पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक मनोहर यादव (नाटक-निर्बुध्द राजाची नगरी), द्वितीय पारितोषिक कपिल गायकवाड (नाटक – द बटर फ्लाईज), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नीलाक्षी संदानशिव (नाटक – मामाचं पत्र हरवल), आयुषी पाटील (नाटक-कॉपी बहादूर), स्वराली जोशी (नाटक-मॅडम), पीहू बिंगले (नाटक-बंद पुस्तक), मिनल चौधरी (नाटक-आई मला छोटी बंदूक देना), तेजस चौधरी (नाटकसहल), वेदांत बागुल (नाटक-एप्रिल फूल), दिगंबर माळी (नाटक- कॉपी बहाद्दर), प्रज्ञेश फडके (नाटक-बंद पुस्तक), संजय पाटील (नाटक-शोध अस्तित्वाचा).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गोविंद गोडबोले (सांगली), श्रीमती नवीनी कुलकर्णी (मुंबई) आणि श्रीमती सुषमा मोरे (नागपूर) यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे व जळगाव केंद्र समन्वयक दिपक पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version