Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित होणार जळगावचे पियुष गांधी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते पियुष संजय गांधी यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याचा आयपीसी अवॉर्ड जाहीर झाला आहे. गोवा येथे शनिवारी ९ एप्रिल रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

आयपीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. परमिंदर पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १७ व्या राष्ट्रीय आईपीसी अवॉर्डची घोषणा झाली असून पणजी येथील ब्रिगांजा हॉल येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यामध्ये इलेकट्रोनिक मीडियाचे अशद शेख, सामाजिक कार्यासाठी पियुष गांधी (जळगाव), शिल्पा गांगुली (गोवा), विपीन पाणिग्रही, सागर नाईक (दोन्ही गोवा) यांच्यासह अनेक जणांचा समावेश आहे.

पियुष गांधी यांना आयपीसी अवॉर्ड जाहीर झाल्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. ते युवा सेनाचे उपजिल्हा युवा अधिकारी असून सुमिरा परिवार, नेहरू चौक मित्र मंडळातर्फे देखील विविध सामाजिक कामात अग्रेसर आहेत. यासह कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी सामाजिक कार्य बजावले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा आयपीसी अवार्ड जाहीर झाला आहे.

Exit mobile version