Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामाजिक जाणीव निर्माण करणे म्हणजे खरे शिक्षण – दिलीप पाटील

rotary club news

जळगाव प्रतिनिधी । प्रतीकुल परिस्थितीत इतरांच्या मदतीने जीवनात यशस्वी झालेल्यांना दुसर्‍या गरजू विद्यार्थ्यांना मदत कार्य करण्याची सामाजिक जाणीव निर्माण होणे म्हणजे खरे शिक्षण होय असे क.ब.चौ.उमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे शिक्षक दिनानिमित्त मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित 15 विशेष शिक्षक व रोटरी वेस्ट परिवारातील व्यवसायाने शिक्षक असलेले सदस्य व कुटुंबीयांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी दिलीप पाटील यांच्यासह अध्यक्ष डॉ. सुशील राणे, मानद सचिव सुनील सुखवाणी, नंदलाल गादिया, गिरीश कुलकर्णी, पद्माकर इंगळे, संजय बोरसे आणि तुषार चित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती देऊन आज शिक्षकांची शिक्षणाविषयी तळमळ कमी होत असून त्यांचे लक्ष वेतन आयोगाकडे आहे. त्यामुळे समाजाचा शिक्षण व्यवस्थेवर विश्‍वास राहिलेला नाही. शिक्षकच विद्यार्थ्यांचे चेहरे ओळखू शकतात. त्यांमुळे सहा सुवर्णपदक विजेती हिमा दास सारखे खेळाडू, विद्यार्थी ओळखले पाहिजे असे सांगून रोटरी वेस्टने दिव्यांगांसाठी काम करणार्‍या संस्था व विशेष शिक्षक शोधून त्यांचा गौरव केला ही खरी गरज आहे अशी कौतुकास्पद भावना व्यक्त केली.
यावेळी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास मंदिर (कर्णबधीर विद्यालय), उत्कर्ष मतिमंद विद्यालय व आशा फौंडेशनच्या शार्प या अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाबद्दल माहिती सादर करण्यात आली.

यांचा केला गौरव
सोहळ्यात श्रवण विकासचे मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, निलीमा तरावटे, अश्‍विनी कुलकर्णी, ज्योती खानोरे, गिरीश बडगुजर, तर शार्प च्या शिक्षिका विनीता भट, अंजना दोषी, प्रतिभा शिंपी, मिनाक्षी सुतार, संध्या नाईक आणि उत्कर्ष विद्यालयाचे अक्षय कुलकर्णी, अरुण हडपे, सुनील सोनवणे, सुनील पाटील, वैशाली भोळे यांचा गौरव करण्यात आला. रोटरी वेस्ट परिवारातील प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा. डॉ. प्रतिभा राणे, प्रा. तनुजा महाजन, डॉ. विजय शास्त्री, सी.ए.मर्तुझा बंदूकवाला, डॉ. अर्चना काबरा, नंदलाल गादिया, रुपा शास्त्री, प्रशांत महाशब्दे, काजल सुखवानी, शंतनु अग्रवाल, प्रविण जाधव, राजेश परदेशी, डॉ. मयुर मुठे, चेतना सतरा, नेहा जोशी, विवेक काबरा, मानसी शहा , सचिन पटेल आदिंचा दिलीप पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार चित्ते यांनी तर परिचय प्रशांत महाशब्दे यांनी करुन दिला. आभार प्रा. राजेंद्र देशमुख यांनी मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली कार्यक्रमास मोठ्या संख्येने सत्कारार्थींच्या कुटुंबीयांसह रोटरी वेस्टच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version