Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे सखी मतदान केंद्रावर सखींची लगबग

raver sakhi matadan

रावेर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज सकाळी सातवाजेपासून उत्साहात सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होतांना दिसत आहे. तसेच सखी मतदार केंद्रावर महिलांची गर्दी होत आहे.

शहरातील सखी मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरु असून रावेर ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रपती अवॉर्ड प्राप्त मुख्य अधिपरिचरिका कल्पना नगरे यांनी प्रथम मतदान करण्याचा बहुमान मिळविला असून मुख्य अधिपरिचरिका नगरे यांचे स्वागत नायब तहसीलदार कविता देशमुख आणि केंद्र अध्यक्ष क्रांती नाईक यांनी गुलाब पुष्प देवून करण्यात आले. रावेर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचे स्वागत करतांना सखी मतदान केंद्र कर्मचारी सोबत तहसीलदार अभिलाषा देवगुणे, नायब तहसीलदार कविता देशमुख, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी ही मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान अधिकारी शे गजाला तबस्सुम, आफरीन तडवी, लीना महाजन, मंगला यांच्यासह महिला पोलीस या महिला कर्मचारी संपूर्ण कामकाज बघणार असून त्यांचा ड्रेस कोड देखील ठरविण्यात आला आहे. महिलांसाठी लागणाऱ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version