Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीबीएलमधून सायनाची माघार

saina

 

मुंबई वृत्तसंस्था । आगामी होणा-या पाचव्या प्रिमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेतून भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने माघार घेतल्याची घोषणा केली आहे. वारंवार दुखापतीमुळे आपल्याला खेळावर लक्ष केंद्रीत करता येत नसल्याने प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मी’ पीबीएलच्या पाचव्या हंगामाचा भाग नसेन. या संपूर्ण वर्षांत दुखापतीमुळे माझी कामगिरी खालावली. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कामगिरी उंचावण्यासाठी मी लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सहाव्या हंगामात मी जरूर खेळेन. मी माझ्या सर्व चाहत्यांची दिलगिरी प्रकट करते, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने सांगितले.

२९ वर्षीय सायनाने गेल्या ‘पीबीएल’ हंगामात नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी, २०२० या कालावधीत होणाऱ्या आगामी हंगामात ती खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील सायनाला चालू वर्षांत विजयासाठी झगडावेच लागले. सहा स्पर्धामध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली. त्यामुळेच हा निर्णय तिने घेतल्याचे बॅडमिंटन क्षेत्रात म्हटले जात आहे.

Exit mobile version