Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वेताळवाडी किल्ल्यावर तोफगाडयाचे लोकार्पण (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 04 28 at 10.21.37 PM

चाळीसगाव (मुराद पटेल) सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत रविवार २८ एप्रिल रोजी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसविण्यात आला. तोफेस या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान करून त्याचे चाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण व भारत विकास परिषदेचे क्षेत्रीय सचिव श्रीपाद टाकळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

तोफगाडा लोकार्पण सोहळ्यात अत्यंत उत्साहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व हळदा, गलवाडे, येथील ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला. प्रथम हळदा गावातून श्रीराम मंदिर येथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून संपूर्ण गावातून शिव पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार व परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवरांनी किल्ल्यावर जाऊन या तोफगाड्याचे विधिवत पूजा केली. यावेळी भंडारा उधळीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो ,गड किल्ले वाचवा महाराष्ट्र वाचवा अशा घोषणांच्या गजरात यातोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आले. हा तोफगाडा चाळीसगाव येथील सह्याद्रीचे शिलेदार अजय जोशी यांनी बनविला असून यासाठी आलेला खर्च संस्थेच संपर्क प्रमूख प्रकाश नायर यांनी स्वतः उपलब्ध करून दिला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंगेश चव्हाण यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक करत अत्यंत निस्वार्थपणे सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी योगदान देत असून पुढील पिढीसाठी हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी समाजातील इतर घटकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन करून मी सदैव सह्याद्री प्रतिष्ठान च्या दुर्गसंवर्धन कामासाठी तन-मन-धनाने मदत करेल असे त्यांनी यावेळी सांगितले . तसेच त्यांनी पुढील चार तोफगाड्यांसाठी दोन लाख रुपयांचा स्वराज्य निधी सह्याद्री प्रतिष्ठानसाठी जाहीर केला. यावेळी श्रीपाद टाकळकर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनीही मनोगतातून मार्गदर्शन केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभरातील विविध विभागांचे प्रमुख शिलेदार व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी हळदा व गलवाडे येथील ग्रामस्थांचा मोलाचे सहभाग व सहकार्य लाभले. सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पवन गिरी यांनी केले.

Exit mobile version