Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात छ. शिवाजी महाराज बहुउद्देशीय सह.बँकेच्या निवडणूकीत ‘सहकार पॅनल’चा विजय

जामनेर प्रतिनिधी | जामनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित निवडणूक पार पडली पडली. यामध्ये आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन पुरस्कृत देखरेख संघाच्या ‘सहकार पॅनल’ने संपूर्ण १३ पैकी १३ जागेवर निवडून येत दणदणीत विजय मिळवला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिका चौकामध्ये फटाके फोडून या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ऍड.ज्ञानेश्वर बोरसे, प्रा.शरद पाटील, विलास पाटील, दीपक चव्हाण, तुकाराम निकम, अण्णा पिठोरे, रवींद्र झाल्टे, आनंदा लावरे, रमेश नाईक, बाबुराव गवळी, गणेश महाजन, संजय देशमुख, छगन झाल्टे, श्रीराम महाजन, बाबुराव हिवराळे, कमलाकर नाईक, पाटील तायडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी व ईश्वरलाल जैन गटाचे समर्थक यावेळी उपस्थित होते.

याआधी कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी संघ या निवडणुकीत आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी सहकार क्षेत्रामध्ये एकत्र येऊन निवडणुका लढविल्या आणि या संस्थावर विजय मिळवला होता. त्या माध्यमातून शेतकरी संघ, मार्केट कमिटी येथील कामकाज चांगल्या प्रकारे सुरु आहे. या माध्यमातून आता ‘देखरेख संघा’च्या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली व संपूर्ण पॅनल निवडून आले आहे.

Exit mobile version