Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर बस स्थानक येथे सुरक्षित अभियान सप्ताहास प्रारंभ

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभागांतर्गत रावेर बस स्थानकात सुरक्षित अभियान सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे.रावेर तहसीलदार बंडू कापसे‌ यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार दीपक नगरे, विभागीय लेखाधिकारी  मिलींद सांगळे, स्थानक प्रमुख संदिप तायडे, वाहतुक निरिक्षक जयेश लोहार,वाहतुक नियंत्रक एस. के. शेख  हे उपस्थित होते.

तहसीलदार  बंडू कापसे यांनी सांगितले की, रावेर  बस स्थानक येथील कार्यक्रमात आल्यानंतर जुन्या काळातील म्हणजेच शैक्षणिक काळातील शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्या. आजही प्रवास करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची पहिली पसंत ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचीच आहे. बस ने प्रवास म्हणजे सुरक्षिततेची हमी असे प्रवासी आजही समजतात. प्रवासी वाहतूक करत असताना चालक व वाहक यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी. प्रवाशांसोबतच आपल्या कुटुंबाचे भान देखील ठेवणे आवश्यक आहे.

वाहन चालविता असताना कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये अथवा मोबाईलवर बोलू नये,  बस दुरुस्ती करताना कुठलाही हलगर्जीपणा न करता मी माझी गाडी दुरुस्त करीत आहे अशी भावना मनात ठेवावी. सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवासी हित जोपासून आपापल्या जबाबदारीचे पालन करावे. अनेक कर्मचारी बसच्या हितासाठी मनापासून सेवा बजावत असतात त्यांचे कौतुक आपण केलेच पाहिजे असेही सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

दीपक नगरे यांनी स्वच्छ बस स्थानक या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक श्री पाटील यांनी रावेर आगाराचा लेखा जोखा सांगत शासनाचे धोरण कर्मचाऱ्यांची भूमिका व प्रवाशाचे कर्तव्य या विषयावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रम यशस्वितेसाठी योगेश जोशी, मनवर तडवी, लिपीक संजय तडवी , सुरेखा तायडे, कोकीळा काळे, सदानंद महाजन, निलेश वाणी, डी. के. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संदीप तायडे यांनी केले.

Exit mobile version