Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सफाई कामगार योजनांपासून वंचित राहता कामा नये-पवार

safai kamgar baithak faizpur

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शासनाच्या धोरणानुसार शासकीय योजनांच्या लाभापासून सफाई कामगार वंचित राहू नये याची काळजी घ्यावी अशी सूचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी येथे सफाई कर्मचार्‍याच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार हे दि ११ ते २१ डिसेंबर २०१९ दरम्यान जळगांव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी गुरूवारी दुपारी फैजपूर नगरपालिका मुख्याधिकारी समेत सफाई कर्मचारी यांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सफाई कर्मचारी यांच्यासाठी शासनाच्या धोरणानुसार घालून दिलेल्या विविध योजनांचा लाभ मिळावा त्यात शहराच्या लोकसंख्याचे आधारावर निकषाप्रमाणे सफाई कर्मचारी नियुक्ती करावी, लाड समितीचीच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्त किंवा मयत सफाई कामगारांच्या जगावर शासनाच्या धोरणांनुसार त्यांच्या वारसांना किंवा समावून घेणे, त्यानंतर सफाई कर्मचार्‍यांना लागणारे साहित्य व गणवेश वाटप करणे, तसेच सफाई कर्मचारी यांच्या शिक्षण गुणवत्तेनुसार त्यांना पदोन्नती देने, सफाई कर्मचार्‍यांना त्यांच्या मालकी हक्काची निवास स्थाने बांधून देने, पालिकेचे व्यापारी संकुलमध्ये अनुसूचित जाती जमाती राखीव असलेल्या ५ टक्के दुकानांपैकी एक टक्के दुकाने सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांना व्यापार उद्योगासाठी देणे, यासह त्यांच्या प्रश्‍नावलिवरील१३ विषयानुसार सफाई कर्मचारी यांना लाभ मिळावा आशा सूचना त्यांनी केल्या. सफाई कर्मचारी यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, प्रभाकर सपकाळे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे, अखिल भारतीय सफाई मजदूरचे महासचिव जितेंद्र चांगरे, सुनील पवार, अनिता खरारे, वासुदेव खरारे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता विपुल साळुंखे यांनी केले या बैठकीला सफाई कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version