Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे साध्वीरत्न किरण महाराज स्मृतीदिन उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांचा द्वितीय स्मृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना स्कुलच्या शिक्षिका पिंकी जैन यांनी महाराजांच्या कार्याबदद्ल सखोल माहीती सांगितली. यावेळी मिताली ललवाणी, प्रियांशा संचेती, उर्जा धाडीवाल, आचल जैन , विनय धाडीवाल या विद्यार्थ्यांनी महाराज साहेब यांच्या कार्याची महती सांगितली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदिश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडिया, प्रभूलाल शर्मा, आणि संजय संघवी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वरूप पाटील यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील, सी. ई. ओ. अतुल चित्ते सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Exit mobile version