Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साधना देशमुख राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील सामाजिक कार्यकर्त्या साधना देशमुख यांना राजमाता बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने त्यांच्या समाजसेवेबद्दल राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेऊन साधना देशमुख यांनी समाजात निस्वार्थ पणे सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेऊन साधना देशमुख यांना राज माता जिजाऊ पुरस्काराने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. या सन्मान पत्रावर संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव, कोषाध्यक्ष विशाल देवकते, महाराष्ट्र महिला अध्यक्षा कल्पना काटकर यांच्या स्वाक्षरी ने सन्मानपत्र सुपृर्त करण्यात आले. साधना रविंद्र देशमुख यांना सन्मानपत्र प्राप्त झाल्या नंतर आणि ती माहिती मिळाल्याचा अनेक मान्यवरांनी सोशलमिडीया व भ्रमनध्वनी द्वारे शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

 

Exit mobile version