Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सदाभाऊंनी केले केतकीचे समर्थन, म्हणाले ती तर कणखर !

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्यावरील खालच्या स्तरावरील टिकेमुळे सध्या अटकेत असलेल्या केतकी चितळेचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समर्थन करत ती कणखर असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणार्‍या अभिनेत्री केतकी चितळेचं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलं आहे. तुम्ही इतरांवर बोलता तेव्हा तेव्हा तुमची नैतिकता कुठे जाते? असा सवाल त्यांनी केला आहे.

 

या संदर्भात खोत म्हणाले, केतकी चितळे ही कणखर आहे, कारण कोर्टात कुठलाही वकील न देता तीनं एकटीनं आपली बाजू मांडली. त्यामुळं तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. केतकीच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या, हे धंदे आता बंद करा.

 

सरकार पुरस्कृत दहशतवाद तुम्ही राज्यात वाढवत आहात का? तुमच्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाहीए का? हा ही या निमित्तानं मुद्दा पुढे येतो. दुसर्‍या बाजूला या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय पदव्या दिलेल्या होत्या. त्यांच्या पत्नीबद्दल तुम्ही काय बोलले होते. चंद्रकांत पाटलांबद्दल तुम्ही काय बोलला होतात. यावेळी कुठे गेली ती नैतिकता? आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची चीड निर्माण होते तेव्हा एक समाज म्हणून तिला टार्गेट केलं जातं, असंही यावेळी केतकीची बाजू घेताना सदाभाऊ खोत म्हणाले.

Exit mobile version