Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर वृत्तसंस्था । माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी सोशल मीडियात याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

सदाभाऊ खोत यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझी कोवीड १९, पॉझिटीव्ह आली आहे मी आता उतम आहे व मी क्वॉरंटाईन झालो आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गणरायाच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत आपण हजर होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version