Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एस.टी. कामगार सेनेत जळगावला दोन महत्वाची पदे !

जळगाव प्रतिनिधी | एस.टी. कामगार सेनेच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत गोपाळ पाटील आणि आर.के. पाटील यांची दोन महत्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, एसटी महामंडळातील कामगार सेनेचे दोन महत्त्वपूर्ण पदे जळगाव विभागाला प्राप्त झालेले आहेत. याची अधिकृत घोषणा खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई येथे केली. सद्यस्थितीत जळगाव आगारात कार्यरत सेनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख गोपाळ पाटील यांची यंदाही याच पदावर नियुक्ती करण्यात आलेली असून जळगाव विभागाचे सचिव आर. के. पाटील यांची राज्य चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

एसटी कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी जळगाव विभागातील आर. के. पाटील यांनी नियमितपणे कागदोपत्री पाठपुरावा केल्यामुळे व एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपाळ पाटील यांनी केलेल्या  कामगिरीमुळे या दोघांना राज्यस्तरीय पदावर नियुक्ती देण्यात  आलेली असल्याचे कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी कळविले आहे. दादर येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गोपाळ पाटील आणि आर. के. पाटील यांच्या माध्यमातून जळगाव विभागाला दोन महत्वाची पदे मिळाली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Exit mobile version