एस.टी. ला अँटिमायक्रोबियल कोटींग ! : जळगाव आगारात प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी | प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने अलीकडेच अँटिमायक्रोबियल कोटींगचा निर्णय घेतला असून आजपासून जळगाव आगारात याला प्रारंभ करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, एसटीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा गाडीत प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी स्पर्श होतो. त्यामुळे कोरोना व अन्य साथरोग पसरविणार्‍या विषाणूंचा धोका वाढण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी महामंडळाने अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

या परिपत्रकानुसार एसटी बसच्या आतील भागास अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केले जात आहे. यामुळे एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षा कवच मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुरखकर, आनंदी आणि कोरोनापासून सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

दरम्यान, जळगाव आगारात आजपासून अँटी मायक्रोबिल कोटींग प्रकियेस प्रारंभ करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात जळगाव आगारातील ८८ तर विभागातील ५०० बसेसला हे कोटींग करण्यात येणार आहे. आजपासून याला प्रारंभ झाला असून याप्रसंगी याप्रसंगी आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे आगार व्यवस्थापक निलेश पाटील श्री चंदनकर  गोपाल पाटील, विनोद पाटील हे उपस्थित होते.

 

Protected Content