Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणी सदस्यपदी रूपचंद कोठारी

जळगाव, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्तेे रूपचंद राजमल कोठारी यांची जळगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारीणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी नुकतेच रूपचंद कोठारी यांना शहर कार्यकारणी सदस्यत्वाचे पत्र प्रदान केले आहे. श्री. कोठारी हे पक्षाचे स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, विशाल देशमुख, संजय जाधव, सुशील शिंदे, सतीश चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ही जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन रूपचंद कोठारी यांनी केले आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

Exit mobile version