Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरएसएस आणि भाजपला ग्रहण लागलेय – आंबेडकर

PrakashAmbedkarLivemint kk5C 621x414@LiveMint

मुंबई प्रतिनिधी । नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या अंमलबजावणीविरोधात आंबेडकर यांच्या पक्षाने आज धरणे आंदोलन आयोजित केले आहे. ‘ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागले आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागले असून हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार जोरदार टीका केली.

‘देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल ४० टक्के हिंदू या कायद्यामुळे बाधित होणार आहेत,’ असे ते म्हणाले. नागरिकत्व कायद्याविरोधातील आजचं धरणं आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला. या आंदोलनात भटके-विमुक्त मोठ्या संख्येनं भटके-विमुक्त सहभागी होणार आहेत. हे लोक रुढीपरंपरांच्या ‘डिटेन्शन’मधून बाहेर आले असले तरी अजूनही त्यातील अनेकांचा संसार गाढव व घोड्याच्या पाठीवर सुरू आहे. नव्या कायद्यामुळं ते पुन्हा एकदा ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ढकलले जाणार आहेत,’ असं ते म्हणाले.

Exit mobile version