Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुक्यात रस्त्यांसाठी ४८ कोटींच्या निधीला मंजुरी

Gireesh Mahajan Controversi

जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील सुमारे १५ रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ४८ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.५) जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे मंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

काम करण्यात येणार असलेले रस्ते पुढील प्रमाणे आहेत. अंबीलहोळ देवीचा रस्ता, मालदाभाडी ते वाघारी, काळखेडा ते नागण, सामरोद ते वडगांव तीघ्रे, पळासखेड़ा काकर ते जिल्हाहद्द, शेवगापिंप्री ते नांद्राहवेली, वडगावसद्दो ते मांडवा, मोयगांव-भागदरा ते शहापुर, पाळधी ते खर्चाणे, भराड़ी ते भिलखेडा, जोगलखेडा फाटा ते जोगलखेडा, मालखेडा ते अंबाडीदिगर आदी. या रस्त्यांच्या भुमीपुजनप्रसंगी जिल्हा परीषदेच्या सभापती रजनी चव्हाण, पंचायत समिती सभापती निता पाटील, नगराध्यक्षा साधना महाजन, शिक्षणसंस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जे. के. चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, छगनराव झाल्टे यांचेसह सर्व जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती स़दस्य, आणि विविध पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.

Exit mobile version