Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आकाशवाणी चौकात आरपीएफ जवानाला मारहाण; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकात किरकोळ वादातून आरपीएफ जवानाला वाहनधारकाने दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, मनोज गिरधर मोरे (वय-३७) रा. धरणगाव जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याची जळगाव येथे आरपीएफ मध्ये नोकरीला आहे. शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नोकरीवरून घरी जाण्यांसाठी आकाशवणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले. त्याठिकाणी एक वाहनधारक धरणगाव येथे जात असल्याचे सांगितले. त्यानुसार ते चारचाकी वाहनात बसले. त्यानंतर वाहनधारकाने अचानक ‘धरणगाव जात नाही’, असे सांगितले. याबाबत वाहनधारकाला विचारले असता वाहनधारकाने जवळील दगड उचलून मनोज मोरे यांच्या डोक्याला मारला यात ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी मानेज मोरे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी २९ जानेवारी रोजी अज्ञात वाहनधारकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Exit mobile version