Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे २९३ रुग्णांची मधुमेह तपासणी

जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईस्ट आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विदयमाने “चला मधुमेह ला हरवू या” या मोफत शिबिरात २९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबिर कांताई रुग्णालय आणि जैन इरिगेशनच्या बांभोरी  येथील आस्थपनेत झाले.

या शिबिरात रुग्णांची शुगर लेव्हल, शुगर लेव्हल जास्त असल्यास जास्त झालेल्या शुगरला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ.राहुल भन्साळी, डॉ.डॉली रणदिवे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.अमेय कोतकर आणि नेत्र तपासणी कांताई रुग्णालयातील डॉक्टरांनी  केली, अशी माहिती रोटरी क्लब जळगाव ईस्ट चे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता यांनी दिली. शिबिर यशस्वीतेसाठी कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी, तसेच डॉ. जगमोहन छाबडा, संग्राम सूर्यवंशी, वर्धमान भंडारी, अभय कांकरिया, संजय शहा, हेमंत छाजे ड, संजय गांधी आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, हे शिबिर दर महिन्याच्या २९ तारखेला होणार आहे.

 

Exit mobile version