Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरीमधून मनुष्याच्या जीवनात बदल आणता येऊ शकते – धीरेन दत्ता

chopda news

चोपडा (प्रतिनिधी)। रोटरीच्या संधीचा फायदा घेतला तर आपल्याला किर्ती सोबतच मानसन्मान सुद्धा मिळत असते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते भोपाल येथील धीरेन दत्ता हे चोपडा रोटरी क्लबचा पद्ग्रहण समारंभ प्रसंगी केले. चोपडा रोटरी क्लबच्या पद्ग्रहण समारंभासाठी आज 3 जुलै रोजी भोपाल निवासी धीरेन दत्ता हे प्रमुखवक्ता म्हणून बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उपप्रांतपाल अनिल अग्रवाल, उपप्रांतपाल विलास पाटील, रोटरीचे नूतन अध्यक्ष नितीन जैन, सचिव धिरेंद्र अग्रवाल, इनरव्हिल क्लबच्या डॉ.कांचन टिल्लू, सचिव चेतना बडगुजर, आणि रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.ललित चौधरी, सचिवपदी प्रणय टाटीया आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात रोटरीची प्रार्थना पंकज नागपुरे, यांनी सादर केली व नवकार महामंत्र जैन युवतींनी सादर करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले रोटरीच्या जेष्ठ सद्स्याचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आले तसेच पद्ग्रहण समारंभात मावळत्या अध्यक्षा सौ पूनम गुजराथी यांनी यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा लेखाजोखा वाचला व सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले सौ रूपाली काबरा यांनी ही इनरव्हील क्लबचा तर रोटरॅक्ट क्लबचा अहवाल सागर नेवे यांनी सादर केले. रोटरीच्या मावळत्या अध्यक्षा गुजराथी यांनी नूतनाध्यक्ष नितीन जैन यांना अध्यक्षपदाचा पदभार दिला तसेच रोटरी मावळते सचिव अनिल अग्रवाल यांनी नूतन सचिव धिरज अग्रवाल यांना पदभार सोपविण्यात आला. यावेळी इनरव्हिल क्लब, रोटरॅक्ट क्लबचे ही पद्ग्रहण झाले. तदनंतर रोटरीने पहिलाच कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात १० शाळेतील मुलांना गणवेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

नवीन सद्स्याची रोटरीत प्रवेश
डॉ.आनंद पाटील, अशोक अग्रवाल, दिलीप जैन, गणेश तरोडे, गौरव महाले, जितेंद्र बोथरा, कुशल बुरड, प्रदीप पाटील, निखिल सोनवणे, पवन गुजराथी, डॉ.प्रफुल्ल सोनवणे, पृथ्वीराजसिंग राजपूत, पुष्पजित सोनवणे, शशिकांत पाटील, शिरीष पालिवाल आदिंनी प्रवेश केला आहे.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमात नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेता जीवन चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील तर आभार प्रदर्शन धिरज अग्रवाल यांनी केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित, व्यापारी, वकील, डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड. अशोक जैन, विलास पाटील, ईश्वर सौदानकर, चेतन टाटिया, विलास कोष्टी, विपुल छाजेड, आशा वाघजळे, रूपेश पाटिल, प्रवीण मिस्तरी आदिंनी मेहनत घेतली.

Exit mobile version