Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणी खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात झालेल्या पावसामुळे  शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

 

गेल्या आठवड्यापासून सतत सुरू असलेला संततधार पाऊस व त्यातच शुक्रवार (दि १६  रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.  मका, कपाशी,सोयाबिन, तुरीचे पिक कोलमडून पडून जमिनदोस्त झाले आहे.  कपाशीच्या कैऱ्या काळवंडून सडायला लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परंतु, अद्याप प्रशासनाने त्याचे पंचनामे केले नाही आहेत.

आज रोहिणी खडसे यांनी पदाधिकाऱ्यांसह  येवती, रेवती, जामठी शिवारात शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व बोदवडच्या प्रभारी तहसीलदार श्वेता संचेती यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क करून सोमवारपासून नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करावा याबाबत चर्चा केली.

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबा पाटील, रामदास पाटील, कैलास  चौधरी, भरत पाटील, गणेश पाटील, किशोर गायकवाड, प्रदिप बडगुजर, दिपक झाबड, विजय चौधरी, रामराव पाटील, प्रमोद धामोडे, सतिष पाटील, किरण वंजारी, हकिम बागवान, लतीफ शेख, मुजमिल शहा, अक्षय चौधरी, राजेश जैस्वाल, मयुर खेवलकर, आनंदा माळी, प्रफुल पाटील उपस्थित होते.

 

दरम्यान, रोहिणी खडसे खेवलकर यांनी यावेळी सांगितले की, जामठी, येवती, रेवती शिवारात वादळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली. माजी मंत्रीआ.  एकनाथराव खडसे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या सोबत पंचनामे करण्या बाबत चर्चा केली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

Exit mobile version