Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

….आणि रोहिणी खडसेंना अश्रू झाले अनावर !

rohinitai

मुक्ताईनगर विशेष प्रतिनिधी । आज भाजपतर्फे रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाभाऊ आपली भूमिका मांडत असतांना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारीबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज सकाळी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपचे तिकिट जाहीर करण्यात आले. यानंतर नाथाभाऊंनी आपल्या समर्थकांसमोर भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी त्यांच्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळेस फक्त एकनाथराव खडसे यांनी काही मिनिटांमध्ये आपली भूमिका मांडून रोहिणीताईंना सहकार्य करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. एकीकडे नाथाभाऊ समर्थकांना भावनिक आवाहन करत असतांना रोहिणीताई खडसे यांना अश्रू अनावर झाले. व त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यामुळे उपस्थितही भावविवश झाले. आपली राजकीय कारकिर्द सुरू होत असतांना वडिलांवर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी अश्रू ढाळले असल्याचे दिसून आले.

Exit mobile version