Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोहिणी खडसेंच्या उपस्थितीत वारकऱ्यांची विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना

rohini khadase

रावेर प्रतिनिधी । आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी मोठ्यासंख्येने महिला व पुरुष भाविक विशेष रेल्वे गाडीने भुसावळ येथून रवाना झाले आहेत. आज सकाळी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी विठ्ठल-रुख्माईची मूर्ती डोक्यावर घेऊन वारक-यांचा भक्तिमय उत्साह वाढवित असुन याठिकाणी मोठ्या उत्साहात विठ्ठलाचा जयघोष करण्यात आला.

माजी मंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. रक्षाताई खडसे यांच्या पाठपूराव्यामुळे रेल्वेतर्फे वारक-यांना विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून दिली होती. आज दि.११ रोजी भुसावळवरून ही गाडी रवाना झाली आहे. आ. चैनसुखजी संचेती, आ.संजय सावकारे, जेडीसीसी बँक जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, भुसावळ पं.स.समिती सभापती प्रीती पाटील, बोदवड पं.स.सभापती गणेश पाटील, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, भुसावळ तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दशरथ कंडेलकर, भुसावळ शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, जि.प. सदस्य सविता भालेराव, भुसावळ पं.स. उपसभापती वंदना उन्हाळे, पं.स.सदस्य मनीषा पाटील, डी.आर.यु.सी.सद्स्य अनिकेत पाटील, गोलू पाटील, सुमित बऱ्हाटे, ए.डी.आर.एम.मनोज शर्मा, वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक आर.के.शर्मा, मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, विशेष विभागीय इंजिनीअर तोमर, स्टेशन डायरेक्टर गोपी अय्यर, पी.आर.ओ.जीवन चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version