Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पैशांच्या अफरातफरीप्रकरणी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात पोहोचले असून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. त्यांच्यासोबत प्रियंका याही आल्या होत्या मात्र, त्या गेटवरून माघारी परतल्या.

१६ फेब्रुवारीपर्यंत ईडी वाड्रा यांना अटक करू शकत नाही. हे प्रकरण लंडनमधील एका मालमत्तेच्या खरेदीबाबत आहे. वाड्रा यांचे सहकारी सुनिल अरोरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अरोरा यांनाही १६ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. त्यांनी लंडमधील १२, ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ १७ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रींग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ईडीचा असा दावा आहे की, या मालमत्तेचे खरे मालक वाड्रा आहेत. ईडीने न्यायालयामध्ये हे पैसे २००९ मध्ये पेट्रोलियम व्यवहारातून मिळाल्याचे सांगितले आहे, मात्र, वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Exit mobile version