‘पसरलेली खडी गोळा करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा’ – नागरिकांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी | निम – अमळनेर या मुख्य रस्त्यावर वळणावर ठिकठीकाणी रुंदीकरण करण्यात आलेल्या जागी कच खडी पसरल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील पसरलेली खडी गोळा करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा” अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

निम रस्त्यावरील मारवड ते थेट अमळनेर दरम्यान ठिक ठिकाणी सात ते आठ जागी वळणं आहेत. गेल्या महिनाभरा पूर्वी याच वळणावर खडीकरण व अंशतः डांबरीकरण सहित रुंदीकरण करण्यात आले आहे. याबाबत प्रवाशी व वाहनधारकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुकदेखील केले जात आहे. मात्र “हे काम अजूनही अपूर्णावस्थेत कशामूळे आहे? याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? की सार्वजनिक बांधकाम विभाग मोठे अपघात होण्याची वाट पाहतोय?” असे एक अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

“रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पसरल्याने दुचाकी वाहने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, शिवाय या वळणांवर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यावी व रस्त्यावरील पसरलेली खडी गोळा करून रस्ता सुस्थितीत करण्यात यावा” अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Protected Content