Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात विजयादशमीनिमित्त उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उद्या दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रशांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मानसिंगका ग्राऊंडवरुन विजयादशमी पथसंचलन आयोजित करण्यात आले.

भारतीय संस्कृती पराक्रम, शौर्य, त्यागाची प्रेरणा देणारी आहे. अधर्मावर धर्माचा विजय मिळवुन पराक्रमाची परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प दिवस म्हणजेच विजयादशमी. प. पु. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी हिंदुंचे संघटन करून त्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सन – १९२५ या वर्षी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

याच संघटनेच्या माध्यमातून गेली ९७ वर्ष व्यक्ती निर्माणाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. याच माध्यमातून उद्या दि. ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रशांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मानसिंगका ग्राऊंडवरुन विजयादशमी पथसंचलन आयोजित करण्यात आले असून या पथसंचलनात जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शाम वाजपेयी व निखिल शिरुळे यांनी केले आहे.

 

Exit mobile version