फैजपूरात सरकारच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन

फैजपूर प्रतिनिधी । उत्तरप्रदेशात काँग्रेसच्या सदस्या प्रियंका गांधी यांना पोलीसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ यावल-फैजपूर काँग्रेसच्या वतीने येथील सुभाष चौकात सकाळी दहाच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्ता रोको आंदोलन चे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी यांनी केले. लखीमपुर खेरी येथे रविवारी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष  मिश्रा यांच्या वाहनाने काही शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले, त्यात आशिष मिश्रा ने गोळीबार केला त्यात एक शेतकरी तिथेच गतप्राण झाला, त्यानंतर आक्रमक झालेल्या दंगलीत सात ते आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करत ताब्यात घेतले या निषेधार्थ यावल व फैजपूर काँग्रेसच्यावतीने केंद्र शासनाचा व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला.  मोदी सरकार, योगी सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनात आमदार शिरीष दादा चौधरी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक तथा गटनेते कलीम मण्यार, शेतकी संघ चेअरमन सुनील फिरके, यावल शहर प्रमुख कादिर खान, फैजपुर शहर प्रमुख शेख रियाज, पं. स. सदस्य सरफराज तडवी, पं. स. सदस्या कलीमा तडवी, जेष्ठ व माजी कार्यकर्ते ओंकार वामन सराफ, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, युवा शहर अध्यक्ष वसीम तडवी, सेवादल काँग्रेसचे कमिटीचे भरत कुंवर, चंद्रशेखर चौधरी, लियाकत अली, मुख्याध्यापक गणेश गुरव, योगेश भावसार,  संजय गांधी निराधार योजनेचे जावेद जनाब, युवक तालुकाध्यक्ष वसीम जनाब, रामराव मोरे, आमोदा माजी सरपंच राजेंद्र पाटील, किरण निंबाळे, इरफान खान, हर्षल दाणी, पिंटू हंसकर, चंद्रकला इंगळे, सीमा गुरव, पुष्पा झाल्टे, ललिता चौधरी, अमोल भिरुड, आसिफ मेकॅनिकल, झीया सर, यासह यावल – फैजपूर परिसरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content