Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर.एल. समूहास ईडीचा दणका : ३१५ कोटींच्या मालमत्ता जप्त !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या सुमारे ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्‍या ७० मालमत्ता जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जैन कुटुंबाने एसबीआयकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात अलीकडेच आर.एल. समूहावर ईडीने छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर मनीषदादा जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली असून या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व आर.एल. गोल्ड प्रा. लि. या कंपन्यांच्या ७० मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यात या कंपन्यांच्या मालकीच्या जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथील मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटमधून दिली आहे.

Exit mobile version