Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलक्रांती अभियानातून होणार इझवाय नदी पुनरुज्जीवीत

WhatsApp Image 2019 05 21 at 8.12.26 PM

यावल (प्रतिनिधी ) २ मे पासून यावल रावेर शिवारात थेंब अमृताचा लोकसहभागातून जलसमृद्धी जलक्रांती अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानाच्या माध्यमातून नद्यांचे पुर्नभरण,नाला खोलीकरण, गाळ काढणे अशी कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.

यावल रावेर शिवारात पाण्याची घटती पातळी,बंद पडणाऱ्या कुपनलिका यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली जलासंधारणाची गरज बघता अभियानाला मोठ्या प्रमाणात लोकासहभाग मिळत आहे.जलक्रांती अभियानाच्या माध्यमातून अट्रावल,सांगवी खुर्द, यावल शिवारात इझवाय नदीवर मोठ्या प्रमाणात काम झाले आहे यात अंदाजित ३०० फुट लांब,२२ फुट रुंद आणि १२ फुट खोल असे ४ चर तर ५०० फुट लांब,२० फुट रुंद आणि १० फुट खोल असे ३ चर,४०० फुट लांब,२० फुट रुंद आणि आणि ६ फुट खोल असे ५ चर, १५० फुट लांब,२० फुट रुंद आणि ५ फुट लांब असे ५ चर असे १७ चर आणि ४० फुट लांब,४५ फुट रुंद आणि १६ फुट खोल असा मोठा गोल गड्डा नदीमध्ये करण्यात आलेला आहे.साधारण १७ चर आणि १ गोल गड्डा करण्यात आलेला आहे आणि पुढील काम अजून सुरु आहे. अभियानाच्या माध्यमातून झालेल्या गुणवत्तापूर्ण कामामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अट्रावल,सांगवी खुर्द आणि यावल परिसरातील भागात मुरणार आहे आणि त्यामुळे निश्चीतच पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल अश्या प्रकारच्या भावना ग्रामास्थानी व्यक्त केल्या आहेत.जलक्रांती अभियानामुळे गावकऱ्यांन मध्ये उत्साहाचे आणि आनदांचे वातावरण निर्माण झाले आहे. काम चालू असतांना प.पु.जनार्दन हरिजी महाराज,प.पु.भक्तीप्रसाद शास्त्रीजी,प.पु.भक्तीकीशोर शास्त्रीजी,आमदार हरिभाऊ जावळे यांनी भेट दिली. याप्रसंगी किरण महाजन, राजेंद्र चौधरी, दिनेश चौधरी, मधुकर चौधरी ,हेमराज खाचणे, नितीन महाजन, डॉं.राहुल चौधरी, विजय चौधरी, लखीचंद महाजन,जितेंद्र महाजन, जितेंद्र महाजन,मधुकर चौधरी,खिलचंद चौधरी,राजेंद्र चौधरी,संजय वाघुळदे,मयूर कोल्हे आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version