Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशीराबाद येथे महिलेस बोलल्यावरुन दंगल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद येथे पतीसोबत दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेला उद्देशून एक जण बोलला. त्याचा जाब विचारल्याने तरुणासह त्यांच्या कुटुंबासह इतर अशा ३६ जणांनी महिलेच्या पतीसह कुटुंबियांना काठ्या, दगड विटा, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाणीत ८ जखमी झाले आहेत.

या घटनेप्रकरणी सोमवार, ८ ऑगस्ट रोजी नशीराबाद पोलिसात ३६ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशीराबाद शहरातील रहिवासी साजिद फरीद शाह वय २४ हे २ ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी शैनीला बी शाह हिला दुचाकीवरुन दवाखान्यात जात होते. यावेळी गावातील शिवाजी चौकामध्ये शरीफ पिंजारी याने साजिद शाह व त्यांची पत्नी शैनीला यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केलं. कुणाला बोलला असं विचारला असता शरीफ पिंजारी याने साजीद शाह याच्या कानशिलात लगावली. यानतर साजीद शाह वडील आणि भावाला सोबत घेवून पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असतांना  यावेळी पुन्हा शरीफ पिंजारी याने साजीद शाह यांच्या वडील  व भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी साजीद शाह याचे कुटुंबिय नातेवाईक हे आले असता शरीफ पिंजारी याच्यासह त्यांच्यासोबत ३० ते ३५ जणांनी साजीद शाह यांच्यासह त्यांच्या कुटुंबिय नातेवाईकांना काठ्या, लोखंडी रॉड, दगड विटांनी मारहाण केली. या घटनेत साजीद फरीद शाह, जावीद फरीद शाह, फरीद चाँद शाह, आरिफ शरिफ शाह, सलीम नुरा शाह, मुस्कान बी मुस्ताक शाह, रिजवाना बी फजल शाह, सलीम नुरा शाह हे आठ जखमी झाले आहेत.

याप्रकरणी साजीद शाह यांच्या तक्रारीवरुन शरीफ रज्जाक पिंजारी, आरिफ शरीफ पिंजारी, मोहसीन शरीफ पिंजारी, कलीम शरीफ पिंजारी, शोएब शरीफ पिंजारी, शकील रज्जाक पिंजारी, शाकीर शकील पिंजारी, जहिर बिस्मील्ला पिंजार, आसिफ पिंजारी, बशीर पिंजारी, बबलु पिंजारी, जावीद बशीर पिंजारी, आबीद बशीर पिंजारी, आसिफ रशीद पिंजारी, अय्युब निजाम पिंजारी, रईस मुसा पिंजारी, मुसा निजाम पिंजारी, रईस रमजान पिंजारी, आसिफ रमजान पिंजारी, मोहसीन रमजान पिंजारी, इम्रान रमजान पिंजारी, फारुक पिंजारी, गोलू पिंजारी, साबीर पिंजारी, आसीफ पिंजारी, रऊफ पिंजारी, नवाज पिंजारी, मुस्ताक पिंजारी, जावीद पिंजारी, आरीफ रशीद पिंजारी, इक्बाल हारुन पिंजारी, रहेमान रज्जाक पिंजारी, इरफान रहेमान पिंजारी, शरीफ रज्जाक पिंजारी सर्व रा.  मोमीन मोहल्ला नशीराबाद या 36 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

Exit mobile version