Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावमधील गेंदालाल मिल परिसरात रिक्षा जाळली

b13639e7 33e8 47e5 a73e 96720a4a34af

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गेंदालाल मील परिसरातील पोलीस चौकीजवळ उभी असलेली रिक्षा अज्ञात समाजकंटकांनी जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मध्यरात्री घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, गेंदालाल मील परिसरात राहणारे रेहमान अरमान खान हे रिक्षा चालवितात. शुक्रवारी रात्री त्यांनी घरासमोर गेंदालाल मील पोलीस चौकीजवळ स्वतःची रिक्षा (क्र.एमएच.१९.व्ही.८१३५) ही नेहमी लावली. मध्यरात्री साधारण २ वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रिक्षा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु याचवेळी रिक्षाच्या टपावर ठेवलेली वीट पडल्याने आवाज झाला. त्यामुळे नागरिकांना जाग आली.त्यानंतर रेहमान खान यांच्यासह परिसरातील लोकांनी धाव घेत आग विझवली. दरम्यान, गेंदालाल मील परिसरात एक पार्टिशनची टपरी जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील कळते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Exit mobile version