Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी वाचविण्याच्या नादात रिक्षा पलटी ; दोन जखमी

riksha accidend

जळगाव प्रतिनिधी । समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना महामार्गावर आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. ही घटना अहुजा नगर जवळ घडली असून अपघातामुळे महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षाचालक विनोद गोपाल मोरे (वय-१९) रा. मेहरुन व त्यांचा मित्र कालू गोसावी (वय माहित नाही) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर दोघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रिक्षा (क्रमांक एमएच 19 व्ही 9039) चा चुराडा झाला आहे. घटनेतील रिक्षा ही मेहरूण येथून पाळधीकडे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांना रिक्षा चालक विनोद यांचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा थेट रोडच्या बाजूला जावून पलटी झाली. महामार्गापासून 50 फुट खोल अंतरावर रिक्षा पडल्याने रिक्षाचा चुराडा झाला आहे.

Exit mobile version