Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कारच्या धडकेत रिक्षातील प्रवाशी जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद महामार्गावर भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कार चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शेख सईद शेख मजीद (५६, रा. नशिराबाद) हे मजूरी करून उदरनिर्वाह करतात. ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जळगावून नशिराबाद येथे येणासाठी रिक्षात बसले. तरसोद फाट्याजवळील टोयोटा शोरूम जवळील राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षाने जात असतांना. त्यांना भरधाव कार क्रमांक (एमएच १५ ईए १७८६) ने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत शेख सईद च्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शेख सईद शेख मजीद यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार ५ एप्रिल रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात(एमएच १५ ईए १७८६) वरील कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन  देशमुख करीत आहे.

Exit mobile version