Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकाचा बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून रिक्षाचालकाच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना गेंदालाल मिल परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मोहसीन बेग अफसर बेग (२९, रा. गेंदालाल मिल) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. गेंदालाल मिल येथे मोहसीन बेग हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. रिक्षा चालवून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी रात्री प्रवाश्यांना सोडून ते घरी परतले. रिक्षा घराजवळ उभी करून घराकडे जात असताना, त्यांना वाटतेचं फिरोज शहा याने अडविले व दारू पिण्यासाठी पैसे द्यावे अशी मागणी केली. बेग यांनी पैसे नसल्याचे त्यास सांगितले. याचा राग येवून त्याने बेग यांना बेदम मारहाण केली. नंतर जवळच असलेली फरशी उचलून ती बेग यांच्या डोक्यात तीन वेळा मारली. त्यामुळे डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होवून ते गंभीर जखमी झाले. नंतर कुटूंबियांनी त्यांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अखेर पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून शहर पोलीस ठाण्यात फिरोज शहा (रा.गेंदालाल मिल) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांना मारहाण होत असताना त्यांच्या खिशातील बारा हजार रूपये कुठं तरी पडून नुकसान झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version