Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावलच्या सभागृहात तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे व तालुका युनिट यांच्या अध्यक्षतेखाली व विविध पदाधिकारी यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीकरिता खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना मांडल्या.यात जि.प,व प.स.गट,गणा मध्ये मीटिंगचे आयोजन करणे,बुथ कमिटी व सर्कल आढावा तसेच पक्ष बांधणी करणे, नवीन शहर कार्यकारिणी व ग्रामीण शाखा स्थापन करणे,गाव तिथे शाखा,घर तेथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करणे, वंचित बहुजन आघाडी पक्षात ओबीसी व मुस्लिम आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक महत्त्वाचे पदे देणे,जे पदाधिकारी पक्षाला वेळ देऊ शकत नाही किंवा पक्षाचे काम करत नाही अशा पदाधिकार्‍यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देण्यात यावे असे मार्गदर्शन शमीभा पाटील यांनी केले.

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे,किरण तायडे चितोडा,राजेश वानखेडे, मोहम्मद शफी यावल,तालुका शहर अध्यक्ष तैपूर कादरी,युवा जिल्हा संघटक भूषण साळुंखे, महासचिव राजेश गवळी, महासचिव संतोष तायडे किनगाव, भूषण तायडे सांगवी, अमोल तायडे सांगवी, ईश्वर तायडे कासारखेडा, किरण तायडे सांगवी, किरण मेढे सांगवी, सचिन बार्‍हे लिधुर, आत्माराम कोळी, मनोज सोनवणे, शुभम भालेराव, ईश्वर युवराज तायडे, सुरेश मधुकर तायडे, कुरबान तडवी यांच्यासह बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी व तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. प्रसंगी वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक महिला व पुरुषांनी जाहीर प्रवेश केला.

Exit mobile version