शेंदूर्णीत शांतता समितीतर्फे आढावा बैठक

शेंदूर्णी प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवासह येणाऱ्या काळातील सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेंदूर्णी येथील बाजार समितीचे कार्यालयात पहुर पोलीस स्टेशन तर्फे शांतता समितीतर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये अमृत खलसे, हभप कडोबा माळी, सुनील शिनकर, राजेंद्र गुजर, पंडितराव जोहरे, नगरसेवक शरद बारी, शंकर बारी, शिवसेनेचे भय्या सूर्यवंशी, सिद्धेश्वर पाटील, बारकू जाधव, योगेश गुजर, रवींद्र सूर्यवंशी, सर्व पत्रकार उपस्थित होते.

 यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी धर्म व संस्कृती रक्षण करतांना इतर धर्माचा आदर बाळगावा जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करू नये हिंदू मुस्लिम ऐक्य राखून सामाजिक सलोख्याचे वातावरण आबादीत राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले, यावेळी अमृत खलसे,पंडितराव जोहरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना शेंदूर्णी येथिल कायदा सुव्यवस्था व सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत असलेल्या कारवाईचे कौतुक करून त्यांच्या कडून करण्यात येणाऱ्या कारवाईत गावकऱ्यांचे शंभर टक्के सहकार्य राहणार असल्याचे सांगितले तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली या वेळी नुकतीच शेंदूर्णी येथे घडलेल्या दंगलीच्या  संदर्भात कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

Protected Content