Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महसूलमंत्री थोरातांनी हटवले स्वत:चेच फलक !

संगमनेर- महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर दौऱ्यादरम्यान स्वतःचा फोटो असलेले नववर्षाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स उतरवायला लावले. समाजातील सर्वच स्तरांतून या कृतीचं कौतुक होत आहे.

संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून भव्य बसस्थानक साकारले आहे. मात्र या बसस्थानकासमोर हौशी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जाते. संगमनेरच्या दौऱ्यावर असलेले थोरात आज बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. तिथे असलेल्या बॅनरवर त्यांचेच फोटो होते. त्यांनी गाडी थांबवून त्यांच्या फोटोचे फ्लेक्स तात्काळ उतरवण्याच्या सूचना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. 

थोरात यांनी, बॅनर्स लावण्याच्या संदर्भात नियमावली तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बसस्थानक व्यवस्थापकांना बोलावून दंडात्मक कारवाई करण्यासही सुचवलं. थोरात यांच्यामुळे बसस्थानक परिसर अवैध बॅनर्समुक्त झाला आहे.

 

Exit mobile version