Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या गुरांवर प्रादूर्भाव झालेल्या लंपी या अति संसर्गजन्य व्याधीमुळे पशुपालक धास्तावले असतांनाच राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज गुरूवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर होते. गुरांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. 

जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यात गुरांवर असलेल्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी परिस्थितीची माहिती देवून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. अशी विनंती केली. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावाची माहिती घेतल्यानंतर “पशुपालकांना वार्‍यावर सोडणार नाही. जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात आणावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील.” असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत बोलतांना सांगितले.

याप्रसंगी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार लताताई सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. शिसोदे यांच्यासह आदी मागन्यवर उपस्थित होते.

Exit mobile version